Breaking News

नेरळ शहरात बारणे यांच्या प्रचाराला जोर

कर्जत : बातमीदार

मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी महायुतीने जोरदार प्रचारफेर्‍या काढण्यात सुरुवात केली आहे. नेरळ गावातील सर्व सहा प्रभागात महायुतीचे कार्यकर्ते मतदारांची घराघरात जाऊन भेट घेत आहेत.

नेरळ शहर शिवसेना शाखा, भारतीय जनता पार्टी नेरळ शहर आणि आरपीआय आठवले गट यांच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार घरोघरी जाऊन केला जात आहे. त्यासाठी शिवसेना नेरळ शहर कार्यालयातून नियोजन करण्यात आले असून, मंगळवारी (दि. 16) आदिवासी भागात महायुतीच्या वतीने मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. त्यात फणसवाडी, आनंदवाडी, आंबेवाडी आणि कोंबलवाडीमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार फेरी काढली होती.

बुधवारी (दि.17) नेरळ गावातील भिताडआळी, सुगवेकर आळी आणि टेपआळी भागात सकाळी तर सायंकाळी ब्राह्मणआळी, कुंभारआळी, हेटकरआळी, जुम्मापट्टी आणि धनगरवाडीमध्ये प्रचाराची फेरी काढली. कर्जत पंचायत समिती सदस्या सुजाता मनवे, भाजपचे तालुका सरचिटणीस प्रवीण पोलकम, तालुका कार्यकारिणी सदस्य मिलिंद साने, नेरळ शहर अध्यक्ष अनिल जैन, प्रज्ञा प्रकोष्टचे कोकण संयोजक नितीन कांदळगावकर, युवा मोर्चाचे प्रज्ञेश खेडकर, महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष वर्षा बोराडे, नेरळ शहर अध्यक्षा नीता कवाडकर, महिला मोर्चा सरचिटणीस नम्रता कांदळगावकर, शिवसेनेचे नेरळ शहर प्रमुख रोहिदास मोरे, शहर संपर्क प्रमुख किसन शिंदे, शहर उपप्रमुख बंडू क्षीरसागर, महिला आघाडी उपतालुका प्रमुख सुमन लोंगले, युवासेना विधानसभा मतदारसंघ सचिव प्रथमेश मोरे, आरपीआयचे शहर अध्यक्ष बाळा संदानशिव, आरपीआय महिला तालुका अध्यक्ष सुरेखा चिकणे, विभाग अध्यक्ष गायकवाड, शिवसेना महिला आघाडी विभाग संघटक चव्हाण, जयश्री कासार, नेरळ ग्रामपंचायतचे माजी सदस्य संजय माधवाणी, रावजी शिंगवा, युवासेनेचे विचारे, विश्वजित नाथ, प्रवीण बाबरे, भाजप युवा मोर्चाचे राहुल मुकणे, शिवसेना गटप्रमुख संतोष सारंग यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply