Breaking News

कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याने सारसोळेकर कमालीचे हैराण

नवी मुंबई : बातमीदार

गेल्या काही महिन्यांपासून सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहा परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. अनेकदा पाणी येतही नाही व त्याबाबत पालिका प्रशासनाकडून कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांना व रहिवाशांना सातत्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कमी दाबाच्या सततच्या होणार्‍या पाणीपुरवठ्याने सारसोळेकर व सेक्टर 6 येथील रहिवासी हैराण

झाले आहेत.

स्वमालकीचे मोरबे धरण असतानाही सारसोळेच्या ग्रामस्थांना व नेरूळ सेक्टर 6च्या रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थ संतापले आहेत. प्रभाग समिती सदस्य मनोज मेहेर यांनी देखील पालिकेकडे पाठपुरावा चालवला आहे, मात्र आश्वासनांव्यतिरिक्त काहीही हाती पडलेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांना एकत्र करत आंदोलनाचा पवित्रा सेक्टर 6च्या रहिवाशांनी घेतला आहे.

Check Also

उलवे नोडमध्ये 23 ते 25 जानेवारीदरम्यान भव्य नमो चषक 2025

खेळाडू, क्रीडारसिक घेणार लाभ -लोकनेते रामशेठ ठाकूर उलवे नोड : रामप्रहर वृत्तलोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Leave a Reply