Breaking News

नेरळ ममदापूरवाडीतील रस्त्याची डागडुजी

विहिरीकडे जाण्यासाठी ग्रामस्थांचे श्रमदान

कर्जत : बातमीदार
नेरळजवळील ममदापूर ग्रुप ग्रामपंचायतीमधील ममदापुरवाडीमधील विहिरीकडे जाणारा रस्ता पावसाळ्यात निसरडा होत असल्याने आदिवासी महिला पाणी भरताना पाय घसरून पडत असत. ही गैरसोय दूर करण्यात येथील ग्रामस्थ यशस्वी झाले आहेत. त्यांनी  श्रमदान करून विहिरीकडे जाणारा रस्ता दुरूस्त केला आहे.
ममदापूरवाडी येथील पिण्याच्या पाण्याची विहीर वाडीपासून दूर खड्ड्यात आहे. वाडीतील महिलांना दररोज तेथून डोक्यावरून पाणी आणावे लागते. या रस्त्यावर प्रचंड उतार आहे. सध्या पावसामुळे हा रस्ता निसरडा झाल्याने पाय घसरून महिला खाली पडतात. वाडीतील महिलांना सातत्याने होणारे अपघात लक्षात घेऊन वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हिरू मालू निरगुडा यांनी वाडीतील मंगलमुर्ती मंडळाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन श्रमदान केले. आणि रस्ता सुस्थितीत तयार केला. या वेळी मंडळाचे अध्यक्ष गणेश निरगुडा आणि सदस्य तसेच ग्रामस्थांनी या वेळी श्रमदान केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply