Breaking News

पर्यटकांच्या गाडीच्या काचा फोडून चोरी

पनवेल : वार्ताहर

पनवेल तालुक्यातील कर्नाळा येथे असलेल्या विसावा रिसॉर्ट या ठिकाणी पर्यटनासाठी आलेल्या काही जणांच्या गाड्यांच्या काचा फोडून अज्ञात चोरट्यांनी मौल्यवान सोन्याचे दागिने, मोबाईल फोन व इतर सामानासह कागदपत्रे चोरून नेल्याची घटना घडली आहे.

विसावा रिसॉर्ट येथे सुनेत्रा धीरज चव्हाण यांच्यासह इतर काही जण पर्यटनासाठी आले होते. त्यांनी त्यांच्या चारचाकी गाड्या पार्किंगमध्ये उभ्या करून ठेवल्या होत्या. त्यातील व्हॅगेनार गाडीच्या चालकाच्या बाजूच्या दरवाजाचे लॉक तोडून, तसेच सचिन सुर्वे यांची ह्युंडाई ईकॉन या गाडीच्या पाठीमागील डाव्या बाजूची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी आतमध्येे ठेवलेले सोन्याचे दागिने, मोबाईल फोन व इतर सामान असा जवळपास 1 लाख 92 हजाराची ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक कारोटे अधिक तपास करीत आहेत. याबाबत दुसरी घटना, अशफाक अहमद सिद्दीकी यांनी त्यांची गाडी पनवेल-मुंब्रा महामार्गालगत उभी नौमानिया मशिदीजवळ उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गाडीची काच फोडून गाडीतील लॅपटॉप, दोन मोबाईल, लायसन्स व इतर महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली आहेत. याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply