Breaking News

जासईच्या तरुणाचा ऑस्ट्रेलियात डंका; सर्वेश घरतला आर्किटेक्चरमधील सर्वोच्च पदवी

उरण : रामप्रहर वृत्त

उरण तालुक्यातील लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जासई गावातील सर्वेश किशोर घरत या आगरी तरुणाने ऑस्ट्रेलियात आर्किटेक्चरमधील सर्वोच्च पदवी मिळवत देशाबरोबर उरण तालुका व जासई गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.

जेएनपीटीमधील अग्रगण्य असलेल्या न्हावाशेवा बंदर कामगार संघटनेचे (अंतर्गत) संस्थापक अध्यक्ष व वरिष्ठ सल्लागार किशोर हरिश्चंद्र घरत आणि उरण लायन क्लबच्या अध्यक्षा वंदनाताई घरत यांचा सुपुत्र

सर्वेश घरत (मु. जासई, ता. उरण) याने ऑस्ट्रेलियामधील व्हिक्टोरिया डीकीन युनिव्हर्सिटीमध्ये आर्किटेक्चरची सर्वोच्च पदवी संपादित केल्याबद्दल युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभात सर्वेश घरतला त्याच्या आईवडिलांच्या उपस्थितीत सन्मानित

करण्यात आले.

ऑस्ट्रेलियात सर्वेश घरतने मिळविलेल्या आर्किटेक्चरमधील सर्वोच्च पदवीमुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply