खोपोली : प्रतिनिधी
येथील गोदरेज कंपनीने सीएसआर फंडातून शुक्रवारी (दि. 9) खोपोली कोविड सेंटरला तीन लाख 80 हजार रुपये किमतीच्या रुग्णोपयोगी साहित्याची भेट दिली.
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष सुमन अवसरमल, माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, नगरसेवक मोहन अवसरमल नगरसेविका वैशाली जाधव, गोदरेज कंपनीचे अधिकारी प्रफुल्ल मोरे, राजेंद्र पाटील, डॉ. देव, तानाजी चव्हाण, कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. कांबळे, डॉ. प्रतिक साळुंके, इत्यादी उपस्थित होते.