Monday , January 30 2023
Breaking News

कोंझरीतील बेकायदा उत्खननाच्या चौकशीची मागणी

‘वायूदूत’ने वेधले जिल्हाधिकार्‍यांचे लक्ष

अलिबाग : प्रतिनिधी

म्हसळा तालुक्यातील कोंझरी येथे मातीचे बेकायदा उत्खनन सुरू आहे. ते थांबविण्यात यावे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी वायूदूत परिवाराच्या राष्ट्रीय अध्यक्ष तृषाली पाटील यांनी रायगड जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

कोंझरी येथील गट क्र. 91 ही शासकीय जागा आहे. या जागतून वहिवाटीचा रस्ता जातो. गावातील शेतकरी या रस्त्याचा वापर शेतावर जाण्यासाठी करतात. परंतु मागील काही दिवसांपासून या रस्त्यावर बेकायदा माती उत्खनन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठा खड्डा पडल आहे. तेथे अपघात होऊन जीवित हानी होण्याची भिती आहे.

या रस्त्यावर होत असलेले खोदकाम ताबडतोब थांबवून हा पारंपारिक रस्ता गावकर्‍यांसाठी खुला करून द्यावा. बेकायदा उत्खननाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आपण रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे, अशी माहिती तृषाली पाटील यांनी अलिबाग येथे पत्रकार परिषदेत दिली.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply