मारुती सुझुकी मारुती सुझुकीच्या स्टॉकमध्ये इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न वन डेमध्ये बनवून त्याने रिट्रेसमेंट घेतली आहे. सध्याचा या शेअरचा भाव 7425.70 आपण या शेअरला सध्याच्या भावाला खरेदी करू शकता. या शेअरचे टार्गेट 7550/ 7600/ 7840 (+7%) असेल आणि स्टॉप लॉस ठेवावा 7260 (-2%).
हिन्दुस्तान पेट्रोलियम हिन्दुस्तान पेट्रोलियम या स्टॉकने 22.75 रु. लाभांश 8 जुलैला दिला आहे. यानंतरसुद्धा शेअरमध्ये घसरण चालूच राहिली. चार्ट पाहिल्यावर असे दिसते की स्टॉक हा रिट्रेसमेंट घेण्यासाठी खाली येत आहे. सध्या या शेअरचा भाव 279 आहे. आपण या शेअरला 267 ते 262 या भावात खरेदी करू शकता. तिथून या शेअरचे टार्गेट 275/280 (+9%) असेल व स्टॉपलॉस 258 (-2.50%). (सावधानतेचा इशारा – शेअर बाजारातील ट्रेडिंगमध्ये जोखीम असते. त्यामुळे ज्यांना ट्रेडिंगचा अनुभव आहे, त्यांनीच ही जोखीम घेणे तसेच स्टॉपलॉस लावल्याशिवाय ट्रेडिंग न करणे अपेक्षित आहे.)