पालघर ः प्रतिनिधी
पालघरमधील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका तरुणाने चक्क सापाला हातात घेऊन दोरीउड्या मारल्या. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. व्हिडीओमध्ये तरुण हातात धामण जातीचा साप पकडून त्याच्यासोबत दोरीउडी मारत असल्याचे दिसत आहे. तरुणाने सापासोबत केलेला हा जीवघेणा खेळ कॅमेर्यात कैद करण्यात आला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युवकाच्या या स्टंटवर सर्पमित्रांसह नागरिकांकडूनही संताप व्यक्त करण्यात आला असून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.