पनवेल : वार्ताहर
पनवेल महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या आणि सिडकोने विकसित केलेल्या नोड्समधील विविध सेवांचे हस्तांतरण शुक्रवारी (दि. 10) पनवेल महापालिकेकडे करण्यात आले. याबाबतचा हस्तांतरण करार विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत झाला. या करारावर सिडको महामंडळातर्फे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी, तर पनवेल महापालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांनी स्वाक्षर्या केल्या.
या वेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री महोदयांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, उपमुख्यमंत्री महोदयांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, उपायुक्त सचिन पवार यांच्यासह महापालिका आणि सिडको महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …