Breaking News

अबोली रिक्षाचालक मारहाण प्रकरण; आरोपीला शिक्षा करून महिलेस न्याय देणार -चित्रा वाघ

पनवेल : वार्ताहर

अबोली रिक्षा चालक महिलेच्या मारहाणप्रकरणी गुरुवारी (दि. 15) भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी वाशी येथील हॉस्पिटलमध्ये जावून त्यांची भेट घेतली तसेच सत्य परिस्थिती जाणून घेतली.

मंगळवारी रात्री अबोली रिक्षा चालक संघटनेची सविता बेले या बेलापूर ते नेरूळ सेक्टर 10 येथे प्रवाशाच्या जबरीमुळे चार प्रवाशी घेऊन गेल्या. या वेळी मीटरप्रमाणे भाडे 75 रुपये झाले असता अज्ञात प्रवाशाने तिच्याबरोबर हुज्जत घालून हिला मारहाण केली. ती सध्या वाशी सेक्टर10 च्या नवी मुंबई महानगर पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून या प्रकरणाची माहिती अबोली रिक्षा चालक संघटनेच्या अध्यक्ष संतोष भगत यांना मिळताच ते ताबडतोब मदतीला धाऊन गेले महिलेची प्रवाश्यांना विरोधात पोलीस तक्रार नेरूळच्या पोलीस ठाण्यात नोंद केली. या महिलेवर झालेला मारहाणीत तिला न्याय मिळालाच पाहिजे अशी अबोली रिक्षा चालक महिला संघटनेची मागणी आहे.

ही घटना भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांना समजता त्यांनी गुरुवारी (दि. 15) वाशी सेक्टर 10च्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये भेट घेतली असता वैद्यकीय अधिकारी प्रशांत जवादे यांच्याशी चर्चा केली असता असे समजले की तिची प्रकृती स्थिर आहे. तिची कोरोना टेस्ट केली असता पॉझिटिव्ह आली असल्यामुळे तिला कोरोना सेंटरला हलवण्यात येणार आहे, अशी माहिती मिळाली.

चित्रा वाघ यांनी पोलीस अधिकार्‍यांना याबाबत फोन करून विचाले असता यातील तीन आरोपी ताब्यात घेतले असून एक लवकरच ताब्यात घेऊ असे त्यांना सांगितले. यावर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या अबोली महिलांच्या पाठीशी मी नेहमी असे या महिलेस न्यास नक्की मिळून देऊ, या पुढे असे कोणा महिलेवर मारहाण होऊ नये यासाठी प्रयत्न करेन तसेच आरोपीला शिक्षा देऊन महिलेस न्याय मिळवून देऊ.

या वेळी माजी खासदार संजीव नाईक सुद्धा उपस्थित होते. त्यांनीही या महिलेला न्याय देण्यासाठी आम्ही अबोली रिक्षा महिलांबरोबर आहोत, असे सांगितले. सर्व अबोली महिलांनी चित्रा वाघ, संजीव नाईक, अध्यक्ष संतोष भगत यांचे आभार मानले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply