Breaking News

मंडळ अधिकारी लाच स्वीकारताना जेरबंद

अलिबाग : प्रतिनिधी

बक्षीसपत्र जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर नावनोंदणी करण्यासाठी अडीच हजारांची लाच स्वीकारताना रोहा तालुक्यातील घोसाळे मंडळ अधिकारी राजेश जाधव याला रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. यातील तक्रारदारांच्या वडिलांनी त्यांच्या मालकीची जमीन तक्रारदार यांना बक्षीसपत्र रजिस्टर करून दिली होती. त्याची सातबारा उतार्‍यावर नोंद करून प्रत उपलब्ध करून देण्यासाठी मंडळ अधिकारी राजेश जाधव यांनी तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. यादरम्यान पडताळणी सुरू असताना तडजोडीअंती लाचेची रक्कम कमी करून ती अडीच हजार रुपये इतकी करण्यात आली. ही रक्कम जाधव यांचा सहकारी महादेव मोरे याला स्वीकारण्यास सांगितली. जाधव यांच्यासमक्ष ही रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघांनाही अटक केली आहे. पोलीस निरीक्षक किशोर साळे, सहाय्यक फौजदार अरुण घरत, कर्मचारी दीपक मोरे, सुरज पाटील, कौस्तुभ मगर यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply