Tuesday , February 7 2023

वृक्षारोपण व संवर्धन मोहिमेबद्दल राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयाला पुरस्कार

कर्जत : प्रतिनिधी

नवी दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने ’एक विद्याथी एक वृक्ष’ या संकल्पनेनुसार वृक्षारोपण व संवर्धन मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयाने जून 2019मध्ये वृक्षारोपण सुरू केले. विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकूण अडीच हजार रोपांची लागवड केली आणि त्यांचे संवर्धनही सुरू आहे. या यशस्वी मोहिमेबद्दल तंत्रशिक्षण परिषदेने महाविद्यालयाला पुरस्कार देऊन सन्मानित केले. धारकर फार्मसी महाविद्यालय गेली 10 वर्षे महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम करीत आहे. नुसते वृक्षारोपण न करता दरवर्षी एक झाड विद्यार्थ्यांना दत्तक देतात. यंदा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने एक विद्यार्थी एक वृक्ष ही संकल्पना पुढे आणली. या संकल्पनेपेक्षा अधिक रोपांची लागवड व त्यांचे संवर्धन करण्याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन काळे यांनी विशेष सभेचे आयोजन करून ही संकल्पना चांगल्या प्रकारे राबविण्याचे ठरविले. या संपूर्ण उपक्रमाची जबाबदारी प्रा. प्रीतम जुवाटकर यांच्याकडे दिली. त्यांनी जून 2019मध्ये हा उपक्रम 10 दिवस राबवून एकूण अडीच हजार रोपांची लागवड केली. फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम अंतर्गत या रोपांच्या संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने घेतली. विशेष म्हणजे या उपक्रमाला वन विभागाने महत्त्वपूर्ण सहकार्य केले. या यशस्वी मोहिमेबद्दल अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने कर्जत येथील राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयाला पुरस्कार जाहीर केला. नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष प्रो. अनिल सहस्रबुद्धे यांच्या हस्ते धारकर फार्मसी महाविद्यालयाचे प्रा. प्रीतम जुवाटकर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply