Breaking News

शास्त्री म्हणतात, इंग्लंड वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार!

दुबई : वृत्तसंस्था

भारतीय टीमचे प्रशिक्षक असले, तरी रवी शास्त्री यांनी इंग्लंड हा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार असल्याचं भाकीत वर्तवलं आहे. ‘इंग्लंडने मागच्या 2 वर्षांमध्ये शानदार कामगिरी केली आहे. त्यांच्याकडे अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. इंग्लंडची बॅटिंग आणि बॉलिंगही खोल आहे. तसेच घरच्या मैदानात खेळत असल्यामुळे ते प्रबळ दावेदार आहेत,’ असं शास्त्री म्हणाले. ‘पण अनेक टीम अशा आहेत, ज्या कोणत्याही दिवशी प्रतिस्पर्धी टीमला हरवू शकतात. वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये तुम्हाला प्रत्येक मॅचमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली पाहिजे,’ असंही शास्त्री म्हणाले.

वर्ल्ड कपसाठीच्या 15 सदस्यीय भारतीय टीमची निवड सोमवारी करण्यात आली, पण आम्हाला वर्ल्ड कपसाठी 16 खेळाडूंची निवड करायची होती, असं वक्तव्य रवी शास्त्री यांनी केलं, तसेच ज्या खेळाडूंना संधी मिळाली नाही त्यांनी निराश व्हायची गरज नाही, असंही शास्त्री म्हणाले. ऋषभ पंत आणि अंबाती रायुडू यांची निवड न झाल्यामुळे काहींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. ‘पण मी टीम निवडीमध्ये पडत नाही. माझं काही मत असेल, तर मी ते कर्णधाराला सांगतो. जेव्हा तुम्ही 15 खेळाडूंची निवड करता तेव्हा कोणाला तरी बाहेर ठेवावंच लागतं, पण हे दुर्भाग्यपूर्ण आहे. मला 16 खेळाडूंची निवड करायची होती. आम्ही याबाबत आयसीसीकडे मागणीही केली. एवढा जास्त कालावधी जर स्पर्धा सुरू राहणार असेल, तर 16 खेळाडू ठेवणं योग्य राहिलं असतं, पण आयसीसीने 15 खेळाडूंचीच निवड करण्याचे आदेश दिले,’ असं शास्त्री म्हणाल्याचं वृत्त एका वेबसाईटने दिलं आहे.

Check Also

कोकणातील वणव्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक

कठोर उपाययोजना करणार -वनमंत्री गणेश नाईक पनवेल : रामप्रहर वृत्तकोकणातील आंबा व काजू बागांचे वणव्यांमुळे …

Leave a Reply