Breaking News

गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना वडखळ पोलिसांनी केली अटक

पेण : प्रतिनिधी

तालुक्यातील वडखळ येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघाजणांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून सुमारे वीस हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला.

 मुंबई- गोवा महामार्गावरील वडखळ जवळील डोलवी येथे गांजा विक्रीसाठी काही युवक येणार असल्याची बातमी वडखळचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने डोलवी येथे सापळा रचून गौळवाडी (ता. कर्जत) येथून मोटारसायकलवरून आलेल्या दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक किलो 600 ग्रॅम वजनाचा सुमारे वीस हजार रुपये किंमतीचा गांजा आढळून आला.

 या प्रकरणी वडखळ पोलिसांनी रोशन भगत (वय 24) आणि गणेश पुरी (वय 21, दोघे रा. गौळवाडी, ता. कर्जत) यांना अटक केली असून, त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भोर, सहाय्यक फौजदार पाटील, हवालदार रुईकर, दिनेश भोईर, अमोल म्हात्रे, राहुल पाटील यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply