Breaking News

दहावीच्या निकालात ‘सीकेटी’ची धवल यशाची परंपरा कायम

पनवेल ः रामप्रहर वृत्त
दहावीत धवल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाचा इंग्रजी माध्यमाचा निकाल 100 टक्के लागला आहे. या वर्षी जरी परीक्षा झाली नसली तरी इयत्ता नववीचा निकाल आणि दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे बोर्डाने हा निकाल जाहीर केला आहे. यंदाच्या निकालाचे वैशिष्ट्य  म्हणजे एकूण 190 विद्यार्थ्यांपैकी 97 विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी आणि 93 विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी प्राप्त झाली आहे.
यंदाच्या निकालात सीकेटी विद्यालयातून प्रज्ञान प्रवीण खंडागळे (96.80%) प्रथम, चेतन किशोर चौधरी व विशाखा सतीश सावरकर (93.60%) द्वितीय आणि दीपक राजेश इपिली (93.40) याने तृतीय क्रमांक पटकाविला.
कोविड महामारीमुळे शाळा बंद असली तरी लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर लगेचच म्हणजे 1 एप्रिल 2020पासून सुरू झालेले प्रभावी ऑनलाइन वर्ग, ऑनलाइन सराव परीक्षा तसेच शक्य तेव्हा प्रत्यक्ष सराव परीक्षा या सर्व मेहनतीचे फलस्वरुप म्हणजेच हा निकाल असल्याचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी सांगितले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाइस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक संतोष चव्हाण, पर्यवेक्षक, मार्गदर्शक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Check Also

‘सीकेटी‘त इतिहास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय परिषद

विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधकांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण …

Leave a Reply