पंढरपुरात मुुख्यमंत्र्यांकडून महापुजा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी (दि. 20) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत शुभेच्छा दिल्या. सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे, अशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
वारी हा महाराष्ट्राचा महान ठेवा असून पंढरपूरला पायी जाण्याची परंपरा शतकानुशतके सुरू आहे, मात्र कोरोनामुळे यंदा राज्य शासनाने वारीवर निर्बंध घातले. फक्त मानाच्या पालख्यांना एसटी बसमधून येण्यास परवानगी देण्यात आली होती. असे असले तरी हा सोहळा पंढरपूरसह महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे, अशी विठ्ठलाचरणी प्रार्थना करूया. वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचे उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे
दरम्यान, आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या गाभार्यात शासकीय महापूजा झाली. या वेळी विठ्ठल मंदिरातील विणेकरी शिवदास कोलते आणि इंदुबाई कोलते हे दाम्पत्य मानाचे वारकरी ठरले.