धाटाव : प्रतिनिधी
कोरोना तिसर्या लाटेची शक्यता निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार रविशेठ पाटील यांच्या वतीने करोना प्रतिकारशक्तीवर्धक औषध वाटप सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमदार रविशेठ पाटील यांच्यातर्फे रोठ बुद्रुकचे सरपंच नितीन वारंगे यांच्याकडे प्रतिबंध औषधे सुपुर्द करण्यात आली.
रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीला आमदार रवीशेठ पाटील त्यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान पाटील यांनी सरपंच यांनी केलेल्या विकासकामांचे कौतुक केले. भविष्यात ग्रामपंचायतीला विकासनिधी कमी पडला तर तो आमदार निधीच्या माध्यमातून दिला जाईल अशी ग्वाही आमदार पाटील यांनी यावेळी दिली.
भाजप युवामोर्चाचे दक्षिण रायगड अध्यक्ष अमित घाग, भाजपचे रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांभेकर, आप्पा देशमुख, मारुती देवरे, विष्णू मोरे, भाजप महिला मोर्चा सरचिटणीस श्रद्धा घाग, ग्रामसेविका अलका बामगुडे, सोशल मीडिया संयोजक राजेश डाके, विलास डाके, नरेश कोकरे, निलेश धुमाळ यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.