मुंबई ः प्रतिनिधी
राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असली तरीदेखील अद्यापही दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडतच आहे. रोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही कधी करोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. मंगळवारी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही कोरोनाबाधितांपेक्षा जास्त होती, तर बुधवारी पुन्हा एकदा करोनाबाधितांची संख्या करोनातून बरे झालेल्यांपेक्षा अधिक आढळून आली आहे. मागील 24 तासांत राज्यात आठ हजार 159 नवीन करोनाबाधित आढळले असून सात हजार 839 रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. याशिवाय राज्यात बुधवारी 165 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचीदेखील नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 60,08,750 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 96.33 टक्के एवढे झाले आहे. तर राज्यात आजपर्यंत 1,30,918 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.09 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,60,68,435 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,37,755 (13.54 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,51,521 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,795 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 94,745 अक्टिव्ह रुग्ण आहेत.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …