Breaking News

महाडमध्ये शेतकरी, मजूरांवर काळाचा घाला; 32 घरे ढिगाऱ्याखाली

महाड : प्रतिनिधी

महाड तालुक्यातील बिरवाडीपासून 14 कीमीवर तलीये या गावी मुसळधार पावसामुळे गुरुवारी (दि.22) दरड कोसळून सुमारे 32 घरे गाढली गेली असून 72 लोक बेपत्ता असल्याची माहिती तलीयेचे सरपंच यांनी दिली आहे. एनडीआरएफ च्या मदतीच्या प्रतिक्षेत ग्रामस्थ आहेत. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.एनडीआरएफ तुकड्या गावात पोचण्याच्या प्रयत्नात आहेत; मात्र बिरवाडी, खरवली मार्ग नदीला पाणी आल्याने रस्ते बंद आहेत. त्यामुळे मदत कार्याला सकाळीच सुरूवात होईल, अशी महिती मिळत आहे.

गाव उतारावर वसलेले असून टप्या टप्यावर घरे आहेत. एक दोन घरे सोडून बाकीचे घरे कच्ची आहेत. गावातील लोक मजुरी करणारे व शेतकरी आहेत. जिल्हा प्रशासनाने या गावाला धोक्याचा इशारा दिला होता, मात्र कोणालाही सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले नसल्याचे समजते.

या घटनेमुळे किती घरांचे नुकसान झाले आहे आणि त्यामुळे किती माणसं अडकली आहेत, याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. पोलीस, स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी पाठवण्यात आली आहे. मात्र रस्त्यावर दरड कोसळली आहे. त्यामुळे गावापर्यंत पोहोचणं शक्य नाही. तरीही प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply