Breaking News

लहानग्यांसाठीच्या कोरोना लसीचे सप्टेंबरपर्यंत निष्कर्ष येण्याची शक्यता

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

भारतात सध्या 18 वर्षांवरील वयाच्या लोकांना कोरोनाची लस दिली जात आहे. आता लहान मुलांच्या कोरोना लसीसंदर्भात एक बातमी समोर आली आहे. एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलेय की, देशात लहान मुलांसाठी बनवली जात असलेली भारत बायोटेक कंपनीची कोरोना लस कोवॅक्सिनची चाचणी सध्या सुरू आहे. याचे निष्कर्ष सप्टेंबरपर्यंत येण्याची आशा आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी करोनाचा प्रभाव काही कमी झालेला नाही. त्यामुळे तिसर्‍या लाटेचे संकट कायम आहे. तिसर्‍या लाटेत लहान मुलांवर सर्वाधिक प्रभाव पडेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाने लसीकरणावर जोर दिला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीचे लहान मुलांवर क्लिनिकल ट्रायल सुरू आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply