मुरूड : प्रतिनिधी
काशीद पूल दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या विजय चव्हाण यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे चार लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश तहसीलदार गमन गावित यांनी प्रदान केला.
अतिवृष्टीमुळे मुरूड तालुक्यातील काशीद येथील छोटा पूल 11 जुलै रोजी कोसळला होता. या दुर्घटनेत विजय चव्हाण (रा. एकदरा) यांचा मृत्यू झाला होता. भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी लागलीच चव्हाण कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले होते, तसेच शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शासन स्तरावर पाठपुरावा करून अॅड. मोहिते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सदर मृताच्या वारसांना चार लाख रुपयांची मदत मिळवून दिली आहे.
मुरूडचे तहसीलदार गमन गावित यांनी कै. विजय चव्हाण यांच्या वारस विजया चव्हाण यांच्याकडे सदर शासकीय मदतीचा धनादेश सुपूर्द केला. त्या वेळी अॅड. महेश मोहिते, महेश मानकर, प्रवीण बैकर, अभिजित पानवलकर आदी उपस्थित होते. शासकीय मदत मिळवून दिल्याबद्दल चव्हाण कुटुंबीयांनी अॅड. महेश मोहिते व त्यांच्या सहकार्यांचे आभार मानले.