Breaking News

परळीत विदेशी दारू साठा जप्त

भरारी पथकाची कारवाई, दोन आरोपी अटकेत

पाली : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या भरारी पथकाने परळी (ता. सुधागड) येथे एका कारमधून विदेशी दारू साठा जप्त केला असून, या प्रकरणी दोघांना अटक केली. पाली-खोपोली राज्य महामार्गवरील वाकण, पाली, पेडली, परळी या मुख्य नाक्यावर भरारी पथकांकडून वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. मुंबईकडून मुरूडकडे जाणारी सुझुकी (महा 04 डीआर 8949) ही कार परळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर भरारी पथकाने थांबविली. तपासणी दरम्यान कारच्या डिकीत 26 हजार 600 रुपये किमतीच्या रॉयल स्टॉगच्या बाटल्या, तसेच 30 हजारांच्या ब्लॅन्डर स्पाईडच्या बाटल्या अशा विदेशी दारूच्या एकूण 60 बाटल्या आढळल्या. त्यांचा पाली पोलिसांनी तत्काळ पंचनामा केला. या कारवाईत मारुती सुझुकी कारसह एकूण तीन लाख 56 हजार सहाशे रुपये इतक्या किमतीचा माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दीपक दत्तात्रेय पाटील (रा. कांदिवली, मूळगाव अंबा कोल्हापूर) आणि सुरज हरिश्चंद्र पानगळे (रा. बोरिवली, मूळगाव वावढुगी वरचीवाडी, पोस्ट शिगे, ता. मुरूड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून, त्यांना अटक  केली आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply