Breaking News

अतानू दास अंतिम 16मध्ये; सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला नमविले

टोकियो ः वृत्तसंस्था

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत तिरंदाजीमध्ये अतानू दासने अंतिम 16 खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे अटीतटीच्या या सामन्यात अतानूने ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचाही पराभव केला. अतानू दासने आधी चीनी ताइपेच्या डेंग यू-चेंगचा 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. अतानूने हा सामना 27-26, 27-28, 28-26, 27-28 आणि 28-26 असा जिंकला. पुढील फेरीमध्ये अतानूने अगदी अटीतटीच्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या ऑलम्पिक गोल्ड मेडलिस्ट ओ जिन्ह्येकचा शूट ऑफमध्ये पराभव केला. पहिल्या सेटमध्ये पराभूत झाल्यानंतर अतानूने पुढील दोन सेटमध्ये चांगली कामगिरी केली. चौथ्या सेटमध्ये अतानूने 27-22च्या फरकाने विजय मिळवला. पाचव्या सेटमध्ये स्कोअर 28-28च्या बरोबरीत होता. त्यामुळे शूट ऑफच्या माध्यमातून या सामन्याचा निकाल लावण्यात आला. अतानूने 6-5च्या फरकाने शूट ऑफमध्ये विजय मिळवला. पहिला सेट 26-25ने गमावल्यानंतर अतानूने जबरदस्त कमबॅक करत गोल्ड मेडलिस्टला पराभूत केले. चौथा सेट अतानूने 27-22 असा जिंकला होता. शूट ऑफमध्ये जिन्ह्येकने नऊचा स्कोअर केला, तर अतानूने लक्ष्याचा अचूक वेध घेत परफेक्ट 10 स्कोअर केला. सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवून अनातूने अंतिम 16 खेळाडूंमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

Check Also

महापालिका कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर

म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज …

Leave a Reply