पनवेल ः रामप्रहर वत्त
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा रायगड अंतर्गत पनवेल तालुक्याच्या वतीने आषाढ पौर्णिमेनिमित्त वर्षावास कार्यक्रमाचा प्रारंभ कळंबोली येथील आम्रपाली बुद्ध विहारात शनिवारी (दि. 24) करण्यात आला. संस्थेचे तालुकाध्यक्ष सुनील वाघपंजे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी भन्ते धम्म सूर्या यांनी धम्मदेसना दिली.
या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णा जाधव, सुरेश गायकवाड, भैयालाल साकेत, विशाल गायकवाड, तसेच कळंबोली विभागातील पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन संस्थेचे तालुका सरचिटणीस राहुल गायकवाड यांनी केले.
वर्षावासाचा हा कार्यक्रम पुढील तीन महिने पनवेल तालुक्यातील सर्व बौद्धविहारांत महिन्याच्या प्रत्येक रविवारी, गुरुवारी व पौर्णिमेला सायंकाळी घेण्यात येणार असून बौद्ध धम्मातील अनेक घटना आणि विचार तत्त्वांवरील विषयात निष्णांत अभ्यासू, विचारवंत, प्रसिद्ध प्रवचनकार व भन्ते यांच्या प्रवचनाचे व धम्मदेसनेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पनवेलकर उपासक, उपासिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.