Breaking News

देशातील 10 राज्यांमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक; केंद्र सरकारकडून आढावा व सूचना

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. मागच्या चार दिवसांत कोरोनावर उपचार घेणार्‍यांची संख्या वाढली आहे. 10 राज्यांत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी या राज्यांचा आढावा घेतला आणि कोरोनासंबंधी कडक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, ओडिशा, आसाम, मिझोरम, मेघालय, आंध्र प्रदेश आणि मणिपूर या राज्यांत कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. 46 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर 10 टक्क्यांहून अधिक आहे, तर 53 जिल्ह्यांत कोरोना रुग्णवाढीचा दर 5 ते 10 टक्क्यांदरम्यान आहे. त्यामुळे तेथे अधिक चाचण्या करण्यावर भर देण्यास सांगण्यात आले आहे. मागच्या काही आठवड्यांत ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर 10 टक्क्यांहून अधिक आहे अशा ठिकाणी कडक निर्बंध लादण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वेळीच उपाययोजना केल्या नाही तर स्थितीत आणखी बिकट होईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply