Breaking News

भाजपच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचार्यांचा सत्कार

कळंबोली : रामप्रहर वृत्त

कळंबोली येथील रहिवासी श्री देविदास जाधव हे नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमातून 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या सत्काराचा कार्यक्रम भाजप कळंबोली आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय येथे साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक कमल कोठारी, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भाजप कळंबोली शहर सरचिटणीस दीलीप बिष्ट, भटके-विमुक्त सेलचे रायगड जिल्हा अध्यक्ष बबन बारगजे, कळंबोली मंडल अध्यक्ष शेलार याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नवी मुंबई परिवहन उपक्रमातील त्यांचे सहकारी तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते मधुकर जाठोत यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन भटके-विमुक्त सेलचे माजी रायगड जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांनी केले होते.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply