Breaking News

पेण अर्बन बँक ठेवीदारांच्या आशा पल्लवित

कर्जत : प्रतिनिधी

पेण को ऑप बँकेसंदर्भात ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळालेच पाहिजेत, बँकेचे असेंट विकून पैसे द्यावेत किंवा राष्ट्रीयकृत बँकेत विलीनीकरण करावे, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे कोकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्याकडे केली आहे. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने पेण अर्बन बँक ठेवीदारांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.

 भाजपचे सुनील गोगटे यांनी नुकतीच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची दिल्ली येथील कार्यालयात भेट घेतली. व त्यांना निवेदन दिले. या वेळी भाजपचे कर्जत तालुका सरचिटणीस राजेश भगत आणि अक्षय सर्वगोड उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार बुडीत बँकेच्या  ठेवीदारांना पाच लाख रुपये 90 दिवसांच्या आत द्यावेत, अशी तरतूद आहे. त्यानुसार पेण को ऑप अर्बन बँकेच्या ठेवीदारांना पैसे दिले गेले पाहिजेत, असे या निवेदनात म्हटले आहे. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच यावर निर्णय घेवू, असे आश्वासन भागवत यांनी दिले आहे. त्यामुळे ठेवीदारांच्या आशा पल्लवित झाल्या असून त्यांना दिलासा मिळाला आहे.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply