Breaking News

राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंध होणार शिथिल

मुंबई ः प्रतिनिधी

राज्यातील कोरोना  रुग्णसंख्येचे प्रमाण घटत असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार 25 जिल्ह्यांना दिलासा मिळणार आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच अंतिम निर्णय घेतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. राज्यातील रुग्णवाढीचा दर कमी असलेल्या 25 जिल्ह्यांमधील निर्बंध उठवण्याबाबत चर्चा झाली आहे, मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव अजूनही जास्त असणार्‍या 11 जिल्ह्यांना लेव्हल-3मध्येच ठेवण्यात येईल. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, पुणे, सोलापूर व कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे, तसेच कोकणातील चार जिल्हे, मराठवाड्यातील बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्यांत निर्बंध कायम राहतील, असे टोपे यांनी सांगितले.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply