पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकूल परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ ह्यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 3) शांतीवन नेरे येथे कुष्ठरोगग्रस्त कुटुंबातील बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.
याचबरोबर शांतीवन परिसरात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व भारत सरकारच्या उन्नत भारत योजानेंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम झाला. या वेळी शांतीवन येथील कुष्ठरोग निवारण समितीचे कार्याध्यक्ष डॉ. प्रमोद ठाकूर व इतर पदाधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
समाजात वृक्षारोपणाबाबत जागरुकता रुजविण्याच्या उद्देशाने सीकेटी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व भारत सरकारच्या उन्नत भारत अभियानांतर्गत शांतीवन नेरे येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक आणि कार्यक्रम अधिकारी ह्यांमार्फत वृक्षारोपण कार्यक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाची हाक देण्यात आली. हा कार्यक्रम संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वसंत. ज्ञा. बर्हाटे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सुर्यकांत परकाळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश साठे, प्रा. सत्यजित कांबळे, प्रा. सागर खैरनार, प्रा. योजना मुनीम, प्रा. आकाश पाटील, प्रा. अपूर्वा ढगे व सांस्कृतिक समन्वयक प्रा. गणेश जगताप यांनी सहभाग घेतला.
उपक्रमाचे यशस्वी नियोजन केल्याबद्दल राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकार्यांचे व स्वयंसेवकांचे, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी कौतुक केले.