कर्जत : बातमीदार
नेरळमधील राजेंद्रगुरूनगर आणि राही हॉटेल परिसरात राहणार्या लोकांच्या घरात 22 जुलै रोजी महापुराचे पाणी घुसले होते. तेथील पूरग्रस्तांना नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेने जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले.
रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने नेरळमधील पूरग्रस्तांना एक महिना पुरेल एवढे रेशन व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संदीप म्हसकर, तसेच राजेश गायकवाड, गिरीश चोथानी, यतीन शाह, नितीन ठक्कर, पंचम परदेशी, सोमेश ठाकरे, राजेश राजे, हसमुख बेर्जे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.