Breaking News

युवा भारत सामाजिक संघटनेेमार्फत पूरग्रस्तांना मदत

माणगाव : प्रतिनिधी

ठाणे येथील युवा भारत सामाजिक संघटनेमार्फत महाड परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना गुरुवारी (दि. 5) जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली.

संघटनेचे युवा सदस्य सागर पाटील, सुरेश मोरे, किशोर गुंडवार व त्यांच्या सहकार्‍यांनी महाड तालुक्यातील पूरग्रस्त गावांत जाऊन तेथील ग्रामस्थांना किराणा सामान, गव्हाचे पीठ, डाळ, तांदूळ, साखर, चहा पावडर, साबण, बिस्कीट पुडे, सॅनिटरी पॅड, ब्लँकेट्स, टुथपेस्ट आदी वस्तू असलेल्या एकूण दोन हजार किलो वजनाच्या पाचशे किटचे वाटप केले. या मदतीबद्दल आपद्ग्रस्त ग्रामस्थांनी संघटनेचे आभार मानले.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply