पनवेल ः कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचा तुरुंगातील मुक्काम 12 ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा आदेश सत्र न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे विवेक पाटलांचा मुक्काम सध्या तळोजा जेलमध्येच असणार आहे. विवेक पाटील यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत 5 ऑगस्ट रोजी पूर्ण होत असल्याने त्यांची गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्समार्फत सुनावणी झाली. या वेळी त्यांना 12 ऑगस्टपर्यंत तुरुंगात ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. आता पुढील सुनावणी 12 ऑगस्ट रोजी होणार आहे.
Check Also
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper