Breaking News

धोनीच्या नावासमोरील ब्ल्यू टिक ट्विटरने हटवली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताचा माजी कर्णधार आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करणार्‍या महेंद्रसिंह धोनीबाबत मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरने धक्कादायक निर्णय घेतला आहे. ट्विटरने धोनीच्या ट्विटर अकाऊंटवरून वेरिफाईड बॅच म्हणजे ‘ब्ल्यू टिक’ (अकाऊंट विश्वसनीय असल्याचे सांगणारे निळ्या रंगाचे चिन्ह) हटवली आहे. ट्विटरने घेतलेल्या या निर्णयामागचे नेमके कारण कळू शकले नाही.
धोनीला भारतातील सर्वात प्रसिद्ध क्रीडा नायकांपैकी एक मानले जाते. क्रिकेटमधील निवृत्तीनंतरही धोनीच्या लोकप्रियतेत कमी झालेली नाही. धोनी सोशल मीडियावर जास्त अ‍ॅक्टिव्ह नसतो, त्यात तो ट्विटरवर फार कमी दिसतो. 8 जानेवारीला धोनीने शेवटचे ट्विट केले होते. अनेक वेळा तो फक्त त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर पोस्ट शेअर करतो.
देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ‘ब्ल्यू टिक’वरून जून महिन्यात बराच गोंधळ उडाला होता. ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक अकाऊंटवरील ‘ब्ल्यू टिक’ काढून टाकली होती, मात्र याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर ‘ब्ल्यू टिक’ पुन्हा देण्यात आली.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply