पनवेल : वार्ताहर
काही दिवसांपूर्वी महाड आणि चिपळूण या ठिकाणी अतिवृष्टीमुळे महापूर आला आणि लोकांचे संसार उद्ध्वस्त केले. सत्यमेव जयते ट्रस्ट इंडिया नेहमीच माणुसकीच्या दृष्टिकोनातून कार्यरत असते. त्यातूनच त्यांनी मोठ्या प्रमाणात या भागासाठी मदतीचा हात दिला आहे.
यामध्ये एक टेम्पो धान्य, पीठ, कपडे, ब्लँकेट, बिस्कीट, पिण्याचे पाणी, बल्ब, सॅनिटायझर, हॅण्डवॉश, सॅनिटरी पॅड, पॅकेज फूड अशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप त्यांनी केले आणि स्वच्छतेच्या कामात हातभार देखील लावला.
ही मदत संस्थेचे सचिव प्रशांत पाटील यांच्या विशेष आयोजनातून, विरार येथील तुकाराम आंबो पाटील यांनी दिलेल्या प्रेरणेने त्यांचे चिरंजीव विकास पाटील यांच्या कल्पनेतून, आशुतोष गहिवाल आणि आंबो वाडी मित्र परिवार, व्हिजन ह्युमॅनिझम यांच्या संयुक्त संकल्पनेतून करण्यात आली. महाडमध्ये पुन्हा एकदा मदत पाठवण्याचा मानस या वेळी प्रशांत पाटील यांनी व्यक्त केला. या वेळी संदीप पाटील, नितीन बने, केदार सावंत, महेश खाके, हितेन, रितेश पाटील, प्रफुल्ल शिंदे, चिन्मय जोशी, राज मन्सूरी, शमीम शेख, आरिफ आदी कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले, त्याबद्दल सत्यमेव जयते ट्रस्ट इंडियाच्या अध्यक्षा शीतलताई मोरे यांनी सर्व सहकार्यांचे आभार मानले.