Breaking News

पेणचे सुप्रसिद्ध गणपती उरणमध्ये दाखल

उरण : वार्ताहर

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्री गणेशाचा गणेशोत्सव काही दिवसावर येऊन ठेपला असल्याने गणपती कारखान्यात मूर्तीकारांची लगबग सुरू झाली आहे. उरण तालुक्यात चिरनेर, उरण, बोकडवीरा, डाऊरनगर, केगाव आंबीलवाडी, चाणजे, करंजा आदी ठिकाणी  असलेल्या  कारखान्यात कारागीर मग्न झाले आहेत.

उरण शहरात, किशोर जगे यांचे सिद्धीविनायक कलाकेंद्र, बाजार पेठ येथील मंगलमूर्ती कलाकेंद्र, श्री गणेश कलाकेंद्र, लंबोदर कलाकेंद्र, अशा विविध नावाने गणपती मूर्ती विकण्यासाठी दुकाने थाटण्यात आली आहेत. अलिबाग तालुक्यातील पेण, हमरापूर आदी ठिकाणांहून गणपतीच्या सुबक व सुंदरमूर्ती आल्या आहेत. नागरिक आपल्या पसंतीप्रमाणे गणेशमूर्ती बुकिंग करतांना दिसत आहेत.

बुद्धीची देवता असलेल्या श्री गणेशाचा गणेशोत्सव कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पाच दिवस आरती, महाप्रसाद, भजन, गाणी, नाच यामुळे एकप्रकारे भक्तिमय  वातावरण असते. गणेशोत्सवासाठी नागरिक लवकरच तयारीला लागत असून, जवळपास एक व महिना आधीपासूनच कारखान्यात आपल्याला हव्या असलेल्या गणेश तर मूर्तीची ऑर्डर देतात. याबाबत उरण शहरातील  स्वर्गीय किशोर जगे यांचे सिद्धी विनायक कला केंद्र राजपाल नाका केंद्राचे कविता किशोर जगे यांनी सांगितले.

Check Also

उलवे नोडमध्ये ग्रेसवेल हॉस्पिटलचे उद्घाटन; मान्यवरांची उपस्थिती

उलवे नोड : रामप्रहर वृत्त सेवाभाव मनामध्ये ठेवून काम करा. ग्रेसवेल हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी येणारा …

Leave a Reply