Monday , February 6 2023

विविध कंपन्यांकडून पनवेलमध्ये कोरोना लसीकरण मोहीम

पनवेल : वार्ताहर

डाऊ केमिकल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड, क्रोडा, एविनिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ओवेन्स कॉर्ननिग (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड. या कंपनीच्या सहकार्याने आणि फ्रीडम फॉर यु फाऊंडेशन यांच्या माध्यमातुन पनवेलमध्ये रिक्षा चालकांचे लसीकरण तसेच, बिगारी कामगार, एस टी ड्राइवर, ट्रान्सपोर्ट चे ड्राइव्हार, आदिवासी नागरिक यांना पनवेल येथील पटवर्धन हॉस्पिटल येथे कॅम्प लावून हजारो मोफत लसीकरण केले.

कोरोनाने अनेकांच्या व्यवसायाची घडी विसकटली आहे. त्यात रिक्षा चालकांला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. सध्या लसीकरणाचा तुटवडा सर्वत्र जाणवतो पैसे देऊन रिक्षा चालकांना लस घेणे अवघड असल्याने अनेक रिक्षा चालक लस घेत नाही त्यामुळे कोरोनाने अनेकाला जीव गमावावे लागले. याचाच विचार करून हे लसीकरण करण्यात आले.

या साठी अविनाश पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. रिक्षा चालकांसाठी लस उपलब्ध करून दिल्याबद्दल रिक्षा प्रतिनिधी पत्रकार संतोष शिवदास आमले, बाळासाहेब झोडगे, मच्छिंद्र पाटील, पूनम शिवशरण आदींनी आभार मानले आहेत.

Check Also

सर्वांच्या सहकार्याने शाळेची प्रगती शक्य -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त गावकरी, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि संस्था या सर्वांचा सहयोग असला, तर …

Leave a Reply