पनवेल : प्रतिनिधी
हर सप्ताह विशेष सा पनवेल महापालिकेच्या मोहिमेंतर्गत नवीन पनवेल प्रभाग क्रमांक 17मध्ये रविवारी (दि. 8) स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.
पनवेल महापालिकेतर्फे हर सप्ताह विशेष सा ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत प्रभाग ’ड’मधील नवीन पनवेलच्या प्रभाग क्रमांक 17 पोदी नंबर अडीच या ठिकाणी रविवारी स्वच्छता दूत व नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. त्यानंतर या प्रभागात स्वच्छता मोहीम राबवून परिसराची स्वच्छता करण्यात आली.
या वेळी क्रमांक 17चे नगरसेवक मनोज भुजबळ, आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, स्वच्छता निरीक्षक भावेश चंदने, अभिजित भवर, महेंद्र भोईर, पर्यवेक्षक रमेश गरुडे, राकेश भुजबळ, क्रांती चितळे व सर्व नागरिक तसेच स्वच्छता दूत उपस्थित होते.