Breaking News

अवैध रेतीप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे तहसीलदारांचे आदेश

मुरूड : प्रतिनिधी

मुरूडमधील नांदगाव समुद्रकिनारी सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन करणार्‍यांविरोधात स्थानिक ग्राम सुरक्षा समितीला फौजदारी गुन्हा दाखल करण्याची परवानगी मुरूडचे तहसीलदार गमन गावित यांनी दिली असल्याने रेती उत्खनन करणारांचे धाबे दणाणले आहेत. नांदगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अस्लम हलडे व अन्य ग्रामस्थांनी या अवैध रेती उत्खनन करणारांविरोधात तक्रार केली होती. त्यांनी तहसीलदार गमन गावीत यांची भेट घेऊन एका तक्रार अर्जासह नांदगावच्या समुद्र किनार्‍याची होत असलेली धूप व परिणामी किनार्‍यालगतच्या उद्ध्वस्त होत असलेल्या नारळ सुपारीच्या बागायतींची दैन्नावस्था दाखवून दिली होती. यावर तहसीलदारांनी मुरूडच्या पोलीस उपनिरीक्षकांना एका पत्राद्वारे दि. 3 जानेवारी 2018 च्या शासन निर्णयानुसार स्थानिक ग्रामसुरक्षा समितीने अवैध रेती उत्खनन करून तिचा साठा करणारांविरोधात तक्रार केल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तहसीलदारांनी दिलेल्या संधीचा उचित उपयोग करून फौजदारी गुन्हे तत्परतेने दाखल करावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply