Monday , February 6 2023

नम्रता कासार पुरस्काराने सन्मानित

मुरूड : प्रतिनिधी

रायगड जिल्हा परिषद सदस्य नम्रता अजित कासार यांना नवराष्ट्र वुमन अचिव्हर्स अवॉर्डने नुकतेच सन्मानित करण्यात आले. त्यांनी येथील आदिवासी व बौद्ध समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी बहुमूल्य कामगिरी केली आहे. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्र वाघ, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हाधिकारी निधी चौधरी, सिनेअभिनेत्री दीपाली सैयद, पिल्लई कॉलेजच्या संचालिका निवेदिता श्रीयंस, नवभारत ग्रुपचे अध्यक्ष श्रीनिवास राव आदींच्या उपस्थितीत नम्रता कासार यांना नवराष्ट्र वुमन अचिव्हर्स अवॉर्ड प्रदान करण्यात आला.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply