पनवेल : वार्ताहर : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराला मुस्लिम समाजबांधवसुद्धा उतरले असून खारघर, तळोजा, नावडा, तळोजा मजकूर आदी भागात मोठ्या प्रमाणात या बांधवांनी प्रचारफेरी काढून कोणत्याही परिस्थितीत धनुष्यबाणासमोरील बटन दाबून महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत. माजी उपमहानगरप्रमुख गुरुनाथ पाटील, सचिन ठाकूर आदींसह शेकडो महायुती पदाधिकार्यांच्या साथीने मुस्लीम समाजबांधवसुद्धा या प्रचारात उतरला असल्याने सध्या खारघर परिसरात महायुतीने चांगलीस आघाडी घेतली आहे. घराघरात जाऊन, तसेच आदिवासी वाडी आदी ठिकाणी जाऊन महायुतीचा प्रचार केला जात आहे. मुस्लीम मोहल्ल्यातसुद्धा महायुतीचा बोलबाला असून कोणत्याही परिस्थितीत मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी विजयी करण्याचा ध्यासच मुस्लीम समाजबांधवांनी घेतला आहे व त्या दृष्टीने ते प्रचार करताना दिसत आहेत.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …