Breaking News

मेडिकल स्टोर चोरट्यांनी फोडले

पनवेल : वार्ताहर

पनवेल शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रसमोरील वेंकटेश मेडिकल स्टोरचे मुख्य शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे. येथील अरुण मालपाणी यांच्या वेंकटेश मेडिकल स्टोअरच्या बंद दुकानाचे मुख्य शटर सहा अज्ञात चोरट्यांनी उचकटून आत प्रवेश केला व दुकानातील रोख रक्कम पहाटेच्या सुमारास लंपास केली. गाडी धुण्यासाठी वॉचमन आला असता त्याला हा प्रकार दिसला. त्याने तातडीने याबाबतची माहिती दुकानमालकाला दिली. सीसीटीव्हीच्या फुटेजमध्येसुद्धा ही घटना चित्रित झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक राजू सोनी यांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्वतोपरी मदत केली आहे.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply