Breaking News

श्रीवर्धनमध्ये डासांचा प्रादूर्भाव वाढला; नागरिक त्रस्त, नगर परिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष

श्रीवर्धन : प्रतिनिधी

शहरामध्ये मागील काही दिवसांपासून डासांचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, श्रीवर्धन नगर परिषदेकडून डास प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. श्रीवर्धन शहरातील गटारे उघडी असल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत आहे. गाड्यांचे टायर, रिकामे पत्र्याचे डब्बे, रिकाम्या करवंट्या यामध्ये पावसाचे पाणी साठून त्यामध्ये डासांची उत्पत्ती होत असते. श्रीवर्धन शहरात सध्या तापाची साथ जाणवत आहे, मात्र बहुसंंख्य रुग्ण खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. श्रीवर्धन नगर परिषदेने शहरात कीटकनाशक औषधाची फवारणी करावी, तसेच पावसाचे पाणी साठून राहते अशा वस्तू नष्ट कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पावसात कीटकनाशकांची फवारणी केल्यास त्यांचा काही उपयोग होत नाही. आता पाऊस थांबला असल्याने आरोग्य विभागाला कीटकनाशकाची फवारणीचे आदेश देण्यात आले आहेत. -किरणकुमार मोरे, मुख्याधिकारी, श्रीवर्धन नगर परिषद

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply