Tuesday , February 7 2023

आजपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया

मुंबई ः प्रतिनिधी

अकरावीची सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिल्यानंतर शनिवार (दि. 14)पासून ग्रामीण भागात अकरावीचे प्रवेश महाविद्यालय स्तरावर, तर राज्यातील सहा महापालिका क्षेत्रात केंद्रीय पद्धतीने प्रवेश होणार आहे. ऑनलाइन अर्ज भरणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे, पसंतीक्रमांक देणे, प्रवेश फेरीमध्ये मिळालेल्या विद्यालयात प्रवेश निश्चित करणे याबाबत (पहिल्या फेरीसाठी) तपशील वेळापत्रकात देण्यात आलेला आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही केली जाईल तसेच  पुढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply