Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गव्हाण येथे ध्वजारोहण

पनवेल : रामप्रहर वृत्त

देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवाजीनगर येथे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युुनिअर कॉलेज आणि मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व टी. एन. घरत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 15) ध्वजारोहण करण्यात आले.

जिल्हा परिषद शाळा कोपर, जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्र गव्हाण आणि गव्हाण ग्रामपंचायत येथेही ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी आणि समन्वय समितीचे सदस्य आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, कामगार नेते आणि रयत शिक्षण संस्थेचे उच्च शिक्षण समितीचे सदस्य महेंद्र घरत, पंचायत समितीच्या सदस्या रत्नप्रभा घरत, मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन भार्गव ठाकूर, शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंता ठाकूर, विश्वनाथ कोळी, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर, सदस्य विजय घरत, उषाताई देशमुख, सुनीता घरत, कामिनी कोळी, योगिता भगत, रघुनाथ घरत, विद्यालयाच्या प्राचार्य साधनाताई डोईफोडे, प्राचार्या प्रणिता गोळे, उपमुख्याध्यापक जगन्नाथ जाधव, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य प्रमोद कोळी, लाईफ वर्कर व समन्वय समिती सदस्य रवींद्र भोईर, तसेच पंचक्रोशीतील अनेक शिक्षणप्रेमी नागरिक, हितचिंतक उपस्थित होते.

या वेळी गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड झालेल्या भाजप युतीच्या माई भोईर यांचा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड झाल्याबदल शरीरसौष्ठवपटू गिरीश पाटील यांचा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply