Breaking News

‘व्हीके’च्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

भाजयुमोचा आंदोलनाचा इशारा

पनवेल : प्रतिनिधी

शहरातील व्ही. के. हायस्कूलच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे बारावीच्या 200 विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून शाळेने जबाबदारी झटकली. भाजप युवा मोर्चाचे (भाजयुमो) अध्यक्ष मयूरेश नेतकर यांनी 20 ऑगस्ट नंतर विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

व्हीके हायस्कूलने बारावीच्या पूर्व परीक्षेचे मार्क आम्ही धरणार नाही. तुम्ही पूर्ण पेपर सोडवला नाहीत तरी चालेल असे परीक्षा सुरू असताना शिक्षक आणि प्राचार्यांनी वर्गात जाऊन मुलांना सांगितले. त्यामुळे अनेक मुलांनी पेपर पूर्ण सोडवला नाही. बोर्डाने परीक्षा रद्द करताना दहावीच्या आणि अकरावीच्या गुणांवर प्रत्येकी 30 टक्के तर 40 टक्के गुण शाळेने देण्यात यावेत असे शासनाने कळवले.हे गुण शाळेच्या हातात होते. बारावीच्या पूर्व परीक्षेच्या गुणांच्या आधारे शाळेने गुण दिले. या गुणांबाबत मुलांची दिशाभूल केली  त्यामुळे विद्यार्थ्यांची टक्केवारी कमी झाल्याने ते इंजिनियरींग किंवा नेव्हीसारख्या परीक्षेला पात्र ठरू शकले नाहीत.

त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी युवा मोर्चाचे अध्यक्ष मयूरेश नेटकर, चिन्मय समेळ व इतर कार्यकर्त्यांनी बुधवारी प्राचार्य प्रमोद ठाकुर यांची भेट घेऊन यातून मार्ग काढण्याची विनंती केली.

या वेळी प्राचार्यांनी  विद्यार्थ्यांचे सर्व आरोप फेटाळून लावून आपली जबाबदारी झटकून टाकली. तुम्हाला काय करायचे ते करा, बोर्डाकडे तक्रार करा असे सांगितले. त्यामुळे आज पनवेलमधील 200 मुलांचे भवितव्य अंधारात आले आहे.

या शाळेच्या व्यवस्थापनाने त्यांच्या कार्यकर्त्यांचे भले करण्यासाठी शिक्षकांना हाताशी धरून विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान केले आहे. ज्या मुलांना कमी गुण मिळाले आहेत त्यांनी आमच्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्या त्यांना फी कमी करून देऊ असा मेसेज ही पाठवला. भावी पिढी शिकली नाही की आपले झेंडे हातात घेऊन उभी राहील हा उद्देश त्यामागे दिसून येत आहे. या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली लढा  देईल. वेळ पडली तर आम्ही तुरुंगातही जाऊ.

-मयूरेश नेतकर, अध्यक्ष, भाजप युवा मोर्चा

फेब्रुवारी महिन्यात पूर्व परीक्षेच्या वेळी आम्हाला या परीक्षेचे मार्क बोर्डाच्या मार्कमध्ये मिळवणार नाहीत त्यामुळे ही परीक्षा मनावर घेऊ नका. काहींना घरी पेपर लिहायला दिले शिक्षकांनी 80 पैकी 10 गुणांचे ओब्जेक्टिव्ह सोडवून पेपर द्या सांगितले. शिक्षक आणि प्राचार्यांनी हे गुण बोर्डाल दिले जाणार नाहीत, असे सांगितले होते. त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे.

-निर्झरा खुटले, विद्यार्थिनी

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply