Breaking News

‘केंद्राच्या नवीन कायद्यामुळे ‘कर्नाळा’ ठेवीदारांना दिलासा’

पनवेल : प्रतिनिधी

कर्नाळा नागरी सहकारी बँकेत माझे पैसे आहेत. माझ्या पतीचे ऑपरेशन असल्याने मी पैसे काढायला गेल्यावर तुम्ही डॉक्टरकडून  लिहून आणा ऑपरेशनसाठी किती खर्च आहे आणि त्यांचा बँक अकाऊंट नंबर द्या, आम्ही त्यांच्या खात्यात पैसे टाकतो, असे बँकेतील अधिकार्‍यांनी सांगितले, पण शेवटपर्यंत पैसे काही दिलेच नाहीत. आता केंद्र सरकारच्या नवीन कायद्यामुळे मला पैसे मिळतील आणि मी नातेवाईकांचे घेतलेले पैसे परत करीन असे, नवीन पनवेलमध्ये राहणार्‍या लीला दिनकर देशमुख सांगत होत्या.

पुणे जिल्ह्याती भोर तालुक्यातील पसूरे गावचे दिनकर देशमुख (वय 81) मुंबईत रेशनिंग खात्यात 33वर्षे नोकरी करून निवृत्त झाले. त्यानंतर नवीन पनवेलमध्ये स्थायिक झाले आहेत. त्यांचा मुलगा नोकरीनिमित्त बँगलोरला असतो. त्यांचा पत्नीने आपल्या जवळचे बचत केलेले पैसे कर्नाळा बँकेत ठेवले. लीलाबाईंनी आपल्याबरोबरच आपल्या मुलींनाही कर्नाळा बँकेत ठेवी ठेवायला लावल्या होत्या.

दिनकर देशमुख यांची तब्येत ठीक नसल्याने उपचारासाठी पैशाची गरज असल्याने कर्नाळा नागरी सहकारी बँकेत लीलाबाई पैसे काढायला गेल्या असता. त्यांना डॉक्टरांच्या खात्यात पैसे टाकतो सांगून पैसे न दिल्याने लीलाबाईंना आपल्या नातेवाईकांकडून पैसे उसने घ्यावे लागले. आता ते पैसे कसे परत करायचे हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे, परंतु केंद्र सरकारच्या नवीन कायद्यामुळे मला पैसे मिळतील आणि मी नातेवाईकांचे घेतलेले पैसे परत करीन, असे लीलाबाई म्हणाल्या.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply