Breaking News

मायकल हसी भारतातच राहणार!

मुंबई ः प्रतिनिधी

आयपीएल स्थगितीनंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात अडकून पडलेत. 15 मेपर्यंत भारतातून येणार्‍या विमान वाहतुकीवर ऑस्ट्रेलियन सरकारने बंदी घातली. त्यामुळे ऑसी खेळाडू मालदिव किंवा श्रीलंकेत आसरा घेण्याचा पर्याय शोधत होते. आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सुरक्षितरीत्या भारत सोडले असून ते मालदिवच्या दिशेने प्रवास करीत आहेत, पण चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज प्रशिक्षक मायकल हसी कोरोनामुळे भारतातच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया व ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशन हे सांगू इच्छिते की, ऑस्ट्रेलियन खेळाडू, सामनाधिकारी व समालोचक यांनी सुरक्षितरीत्या भारत सोडले असून ते मालदिवच्या दिशेने रवाना झाले आहेत. भारतातून येणार्‍या विमान प्रवासाला सुरुवात होईपर्यंत ऑस्ट्रेलियन सदस्य मालदिवमध्ये राहतील. क्रिकेट ऑस्ट्रेलिया व ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशन यांना ऑस्ट्रेलियन सरकारकडून कोणतीच सूट नकोय, असे स्पष्ट करण्यात आले आहे.   आपण सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार. दोन दिवसांपेक्षा कमी कालावधीत त्यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी मालदिवला जाण्याची सोय केली आहे. मायकल हसी याला कोरोना झाल्यामुळे तो भारतातच उपचार घेण्यासाठी राहणार आहे. हसीची प्रकृती ठणठणीत आहे, असेही सांगण्यात आले आहे.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply