Breaking News

शेकाप कार्यकर्ते बुधवारी करणार भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त
शेतकरी कामगार पक्षाचे ओवळे विभागातील युवा नेते सुनीलशेठ म्हात्रे, तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते गजानन म्हात्रे, तुकाराम म्हात्रे, संतोष म्हात्रे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते बुधवारी (दि. 25) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत.
पनवेल शहरातील मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सकाळी 10. 30 वाजता हा पक्षप्रवेश सोहळा राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा विद्यमान आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Check Also

सीकेटी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन …

Leave a Reply