Breaking News

लोकमाता अहिल्यादेवी होळकर उद्यान होणार संरक्षित; सभापती संजय भोपी यांच्या पाठपुराव्याला यश

पनवेल ः प्रतिनिधी

खांदा वसाहतीतील सेक्टर 6 येथील लोकमाता अहिल्यादेवी होळकर उद्यानाला संरक्षण रेलिंग आणि प्रवेश गेट बसवण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ मंगळवारी (दि. 16) करण्यात आला. यामुळे हे उद्यान संरक्षित होणार आहे. याकरिता स्थानिक नगरसेवक म्हणून प्रभाग समिती ‘ब’चे सभापती संजय भोपी यांनी सिडकोकडे पाठपुरावा केला होता. वारंवार पत्रप्रपंच व अधिकार्‍यांशी संपर्क करून हे काम करण्यास भोपी यांनी सिडकोस भाग पाडले. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

वसाहतीत फक्त तीनच उद्याने आहेत. त्यापैकी एक सेक्टर 6 येथे अष्टविनायक हॉस्पिटलच्या बाजूला आहे. त्यालाच लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले आहे. दरम्यान, खांदेश्वर तलावासमोर असलेले हे उद्यान सर्वांनाच सोयीस्कर आहे. बाजूला झाडे असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात हिरवाई आहे. त्याचबरोबर उद्यानात जॉगिंग ट्रॅक, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आहे. याव्यतिरिक्त लहान मुलांना खेळण्यासाठी छोटेसे चिल्ड्रेन पार्क आहे. परिणामी या ठिकाणी सकाळ-संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. दरम्यान, खांदा वसाहतीतील नागरिकांच्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्त्वाचे गार्डन आहे. असे असताना या ठिकाणी असलेली संरक्षण रेलिंग तुटून गेली आहे. याव्यतिरिक्त तीनही बाजूचे गेट नसल्यात जमा आहे. परिणामी रात्रीच्या वेळी येथे मद्यपींचा अड्डा बनला. गर्दुल्ल्यांचा वावर वाढल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडत आहे.

याव्यतिरिक्त भटकी कुत्री आणि मोकाट जनावरांचा या ठिकाणी वावर सुरू आहे. प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे या ठिकाणी सुरू असतात. या सर्व पार्श्वभूमीवर या उद्यानाला संरक्षित रेलिंग व प्रवेश गेट तयार करण्यात यावे, अशी मागणी सभापती संजय भोपी यांनी सिडकोकडे लावून धरली होती. यासाठी वारंवार पत्रव्यवहार करून प्राधिकरणाला स्मरण करून दिले होते. तसेच अधिकार्‍यांकडेही पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने सिडकोने या उद्यानाला संरक्षित करण्याचे काम हाती घेतले आहे. संरक्षण रेलिंग त्याचबरोबर तीनही बाजूला गेट बसवण्यात येणार आहे. या वेळी सभापती संजय भोपी, नगरसेवक एकनाथ गायकवाड, सतीश म्हात्रे, ज्येष्ठ नागरिक श्रीरंग वळकुंडे, बंडगर भाजप युवा मोर्चाचे नवनाथ मेंगडे, निलेश घाडगे, कंत्राटदार रवी भोईर व गुरुनाथ दूंदरेकर उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply